किंमत बायोडाटा तयार करा

लग्न

गुणमिलन (३६ गुण)

दोघांची नक्षत्रं आणि चरण निवडा. ३६ पैकी किती गुण जुळतात आणि नाडी-भकूटचा अर्थ काय ते पाहा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

लग्नासाठी किती गुण जुळणे आवश्यक आहे?

परंपरेनुसार ३६ पैकी १८ पेक्षा जास्त गुण स्वीकार्य मानले जातात. २५ ते ३२ गुण चांगले आणि ३३ पेक्षा जास्त उत्तम मानले जातात. तरीही नाडी, भकूट आणि मंगळ दोष वेगळे तपासले जातात.

नाडी दोष म्हणजे काय?

वधू आणि वर दोघांची नाडी (आद्य, मध्य किंवा अंत्य) एकच असल्यास नाडीचे ८ पैकी ० गुण मिळतात, याला नाडी दोष म्हणतात. काही परिस्थितींत हा दोष मानला जात नाही; त्यासाठी ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.

माझे जन्मनक्षत्र कसे कळेल?

जन्मनक्षत्र आणि चरण जन्मपत्रिकेत लिहिलेले असतात. पत्रिका नसल्यास जन्मतारीख, अचूक वेळ आणि ठिकाण सांगून ज्योतिषांकडून काढून घ्या.

हेही उपयोगी पडेल