डिलिव्हरी धोरण
डिजिटल उत्पादने कशी आणि किती वेळात मिळतात.
शेवटचा बदल: 27/11/2026
ashunath.com वर कोणतीही वस्तू कुरिअर किंवा पोस्टाने पाठवली जात नाही. सर्व उत्पादने डिजिटल आहेत.
डिलिव्हरी कशी होते
- Razorpay वर पेमेंट यशस्वी होताच खरेदी लगेच तुमच्या ब्राउझरमध्ये सुरू होते.
- त्याच पानावर वॉटरमार्कशिवाय इमेज, PDF किंवा Excel डाउनलोड करता येते.
- खरेदीची मुदत उत्पादनानुसार ३० दिवस ते १ वर्ष असते, ती खरेदीपूर्वी दाखवली जाते. मुदतीत हवे तितके डाउनलोड करता येतात.
दुसऱ्या फोनवर किंवा ब्राउझरमध्ये
किंमत पानावरील “खरेदी परत मिळवा” मध्ये Razorpay च्या SMS किंवा ईमेलमधील पेमेंट ID टाका. खरेदी त्या उपकरणावर सुरू होईल.
खरेदी सुरू झाली नाही तर
पेमेंट ID सह [email protected] वर लिहा. आम्ही २४ ते ४८ तासांत खरेदी सुरू करून देऊ किंवा परतावा देऊ.